खांदेश्वर पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांना पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेकडून शुभेच्छा
पनवेल : प्रतिनिधी
मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी पंचशील नगर सामाजिक संस्थेकडून खांदेश्वर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदभार घेतलेले श्री सुभाष कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव राहुल पोपलवार, खजिनदार भानदास वाघमारे, संघटक कैलास नेमाडे, सदस्य संतोष ढवळे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.