रोहा नगर पालिका शिक्षण प्रशासन अधिकारी? की मंगलवाडी संकूल प्रशासन अधिकारी?
मंगलवाडी संकूल बदल्या : कुणी हसल्या, तर कुणी ढसाढसा रडल्या!
बदल्या करताना "आवडती-नावडती" असा विचीत्र भेदभाव?
प्रशासन अधिकारी कारवाईच्या रडारवर
धाटाव/रोहा : किरण मोरे
पटनिश्चितीनुसार नेहरू नगर शाळेत एक शिक्षक कमी पडतोय, शाळा क्रमांक 10 मध्ये एक शिक्षक अतिरिक्त होतोय. शाळा क्रमांक 9 मध्ये एक शिक्षक अतिरिक्त होतोय.
खरा गेम आता सुरु झाला. कृष्णाने राधेसाठी लिला रचली. पाकिटाची रक्कम ठरली. शाळा क्रमांक 10 मधील शिक्षकाची बदली मंगलवाडी संकुलात शाळा क्रमांक 9 मध्ये झाली. प्रशासन अधिकाऱ्याचे खिसे गरम झाले? शाळा क्रमांक 10 च्या अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन झाले. पण गणित आणखीनच किचकट झाले. शाळा क्रमांक 8 ला शिक्षक देणे आवश्यक होते आणि शाळा क्रमांक 9 मध्ये 2 शिक्षक अतिरिक्त झाले. आता प्रशासन अधिकाऱ्याने नव्या कृष्णावर जबाबदारी सोपवली. आवडती आणि नावडतीची नावे ठरली. पाकीटे भरली गेली. आवडतीला एक वर्ष मुदतवाढ मिळाली. नावडतीची मात्र शाळा क्रमांक 8 मध्ये बदली झाली. गावकऱ्यांवर शोककळा पसरली. रडारड सुरू झाली. राजकीय नेते सांत्वनाला आले. प्रशासन अधिकाऱ्याचा वर्षभराचा कोटा पुर्ण झाला.
पण आता प्रशासन अधिकाऱ्याचे कंसमामा सारखे शंभर गुन्हे पुर्ण झाले आहेत. त्यांची लेखी तक्रार शिक्षण आयुक्त आणि उपसंचालक मुंबई यांच्याकडे झाली आहे. त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. एका संकुलात तीन वेगवेगळ्या कमी पटांच्या प्राथमिक शाळा कशासाठी? कमी पटांच्या शाळेवर मंजूर नसताना मुख्याध्यापक नियुक्ती कशासाठी? जास्त पटाच्या शाळेवर पूर्ण वेळ मुख्याध्यापक का नाही? मंगलवाडी संकुलातील वर्षानुवर्षे एकाच शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या संकुलाबाहेर बदली का होत नाही?
मंगलवाडी संकुलातून शिक्षण समितीच्या कार्यालयात वार्षिक हप्ता किती? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रशासन अधिकाऱ्यांना आता द्यावी लागणार आहेत. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका निर्माण झाल्याचे चित्र समोर दिसत आहे.