गांधे आदिवासीवाडी येथून तरुण बेपत्ता
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
गांधे आदिवासीवाडी येथून दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घरात कोणास काही एक न सांगता दिपक निलेश वाघमारे वय २५ वर्ष रा. गांधे आदिवासीवाडी, ता. पेण हा तरुण बेपत्ता झाला. त्यानंतर आपला मुलगा हरविल्याची तक्रार निलेश लक्ष्मण वाघमारे वय ४५ वर्षे यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली.
दिपक वाघमारे (२५) असे त्या तरुणाचे नाव असून उंची ५ फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, चेहरा गोल, नाक सरळ, केस कुरळे, मिशी बारीक, अंगात सफेद रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काळे बूट, तसेच तो मूकबधीर आहे.
अशा वर्णनाचा तरुण कुणालाही अढळल्यास एफ. बी. तडवी सहाय्यक फौजदार, नागोठणे पोलीस ठाणे मो. नं. ७७०९१६७७५७ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एफ. बी. तडवी हे पुढील तपास करीत आहेत.