ग्रामसेवकाच्या फार्म हाऊसवर "खादाड" अभियंत्याच्या दारूच्या पार्ट्या!

रोहा तालुक्यातील "खादाड" अभियंत्यावर राजकीय वरदहस्त?
बोगस कामांची बिले काढण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने सज्ज!
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींंच्या हद्दीत विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून या चुकीच्या कामांची बिले काढण्याचे काम एक "खादाड" अभियंता करीत आहे. तसेच काही ठिकाणी तर विकासकामे झालेलीच नाहीत, तरीही ती कामे उत्कृष्ठरित्या पूर्ण झाल्याचे फक्त "कागदोपत्री" नोंद करून त्या न झालेल्या कामांची देखील बोगस बिले या अभियंत्यांने काढली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार हा राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते/पुढारी यांच्यामार्फतच होत असल्याने त्यांच्याच चुकीच्या कामांची बिले काढण्याचे काम हा "खादाड" अभियंता करीत असल्यामुळे त्याची राजकारण्यांशी चांगलीच गट्टी जमली आहे. तसेच या खादाड अभियंत्याला ग्रामसेवकांची साथ मिळत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 
या अभियंत्याच्या दारूच्या पार्ट्यांमध्ये काही ग्रामसेवक देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत असतात. तर काही ग्रामसेवकांच्या फार्म हाऊसवर देखील या अभियंत्याची दारू-मटणाची पार्टी रंगत असल्याची चर्चा संपूर्ण रोहा तालुक्यात आहे! त्यामुळे शासनाचा पगार घेऊन भ्रष्टाचाऱ्यांची दलाली करणाऱ्या या ग्रामसेवकांची प्रथम चौकशी होणे गरजेचे आहे.

Popular posts from this blog