अवकाळी पावसाने बळीराजाचे केले अतोनात नुकसान! 

बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेने मागितली शासनाकडे दाद

धाटाव/रोहा : किरण मोरे  

दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रायगड जिल्ह्यातअवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळणे बाबत जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसील कार्यालय रोहा यांच्या कार्यालयात बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेच्या वतीने लेखी निवेदने देण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदितीताई तटकरे यांना देखील यासंदर्भात या संस्थेतर्फे निवेदन देण्यात येणार आहे.

या अवकाळी झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे फारच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झाला असुन

शेतात रचून ठेवलेल्या मळण्या भिजल्या असून ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सदर संस्थेने मागणी केली आहे.

तसेच बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेची मागणी आहे की, शेतकऱ्यांनी कापून ठेवलेली भातपिके तसेच शेतीत रचून ठेवलेल्या धान्याच्या मळण्या भिजल्याने शेतकऱ्यांचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. शेतकरी पुरता चिंतातूर झाला असून मोठे नुकसान झालेले पहायला मिळत आहे. 

रायगड जिल्ह्यातील जवळ जवळ सर्वच तालुक्यात वरील दोन दिवस सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली असुन येथील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी या संस्थेची मागणी आहे.

रोहा तालुक्यातील, कोलाड खांब ते घोसाळा पासुन चणेरा तसेच नागोठणे, मेढा पासुन धोंढखार कुदे परिसरात अवकाळी पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 

यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुभाव नंतर महापुराचा  फटका यामध्ये बि बीयाणे व खतांची झालेली प्रचंड भाव वाढ यामध्येच मजुरीत झालेली प्रचंड वाढ व भाताला कवडी मोलाचा भाव देऊन व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांसाठी होत असलेली पिळवणूक यांनी त्रस्त झालेला शेतकरी आपल्या आशेवर अवलंबून आहे. संघटनेने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, शासनाच्या स्तरावर चौकशी होऊन घटनास्थळी जाऊन प्रत्येक्षात पंचनामे करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी. त्याचप्रमाणे भात खरेदी केंद्र सुद्धा लवकरात लवकरच चालू होणे बाबत मागणी केली आहे आणि केंद्रावरील खरेदी केलेल्या धाची रक्कम सुद्धा जास्त विलंब न लावता शेतकऱ्यांना मिळायला हवी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

राज्य व्यापी बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था, जिल्हा रायगड ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असते. अनेक प्रसंगवधानास उभी रहाते. वरील निवेदने देते वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय पाशिलकर, उपाध्यक्ष शिवाजी मुटके, रायगड जिल्हा अध्यक्षा प्रियांका कांबळे, तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog