पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला विरोधीपक्ष नेते श्री. प्रितम म्हात्रे यांच्याकडून वॉटर प्युरिफायर भेट!
पनवेल : शंकर वायदंडे
पनवेल खांदा कॉलनी सेक्टर ६ येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानातील अमोल ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत RO वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले. भारतीय धनगर परिषद खांदा कॉलनी यांनी श्री. प्रितम दादा म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार जे एम म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम दादा म्हात्रे यांनी संस्थेच्या वतीने तत्काळ RO वॉटर प्युरिफायर बसवून दिले. आज याचे उद्घघाटन करण्यात आले.
वेळोवेळी मागणी करूनही कोणी लक्ष दिले नाही परंतु सदर विषय आम्ही विरोधी पक्षनेते श्री.प्रितमदादा म्हात्रे यांना सांगितल्यावर त्यांनी त्वरित सहकार्य केले त्याबद्दल भारतीय धनगर परिषदे च्या पदाधिकाऱ्यांनी प्रीतम दादांचे आभार मानले.यापुढेही कोणत्याही प्रकारचे आपणास सहकार्य लागल्यास शेतकरी कामगार पक्ष, खांदा कॉलनी आपल्या सोबत आहे असे श्री.प्रितम दादा म्हात्रे यांनी तेथील उपस्थित स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासीयांना आश्वासन दिले.
यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, उपनगराध्यक्ष गणेश पाटील, नगरसेवक शिवाजी थोरवे, श्री. विजय काळे, कामगार नेते महादेव वाघमारे, श्री.अनील बंडगर, ॲड.किरण घरत , ह.भ.प. प्रकाश मुळीक, श्री.शिवाजी शिलकर, श्री.महेंद्र कांबळे,श्री.सागर भडांगे, श्री.श्याम लगाडे, श्रीमती अश्विनीताई जोगदंड, श्री.संतोष सावंत, श्री.अनंत म्हात्रे, श्री.मंगेश अपराज, किरण गावंड, श्री.पेडणेकर, जानकर, महेश राऊत, महेश वलकुंडे, भाऊसाहेब लबडे आदी उपस्थित होते.।।,