पत्रकार संघटना तळा प्रेस क्लब कार्यकारणी जाहीर 

संजय रिकामे यांची तालुका अध्यक्षपदी फेर निवड

तळा : संजय रिकामे

रायगड प्रेस क्लब ही पत्रकारांची शिखर संस्था असुन रायगङ जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्या बरोबरच जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातुन महत्वाचे काम करत आहे रायगड प्रेस क्लबचे संपूर्ण रायगड जिल्ह्यात जाळे पसरले असून तळा शाखेची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. 

तळा प्रेस क्लबचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळा प्रेस क्लबची बैठक पार पडली यावेळी मुळे यांनी सर्वानुमते तळा प्रेस क्लब कार्यकारणी जाहीर केली यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संपादक अधक्ष्य डी. टी. आंबेगावे उपस्थित होते. अंबेगावे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संघटन म्हणजे मी नव्हे आपण सर्व म्हणजे संघटन असे प्रतिपादन करीत पत्रकार समस्या सोडविण्याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच पत्रकार विराज टिळक यांनी पत्रकारांना आपल्या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.रायगड प्रेस क्लबचा वार्षिक कार्यक्रम माणगाव येथे होणार असून त्याबाबत पत्रकार किशोर पितळे यांनी माहिती दिली. 

तळा प्रेस क्लब कार्यकारणी मध्ये पत्रकार संजय रिकामे यांची तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली. उपाधक्ष्य पदी किशोर पितळे, सचिव पदी देवयानी सालेकर, खजिनदार पदी नजीर पठाण तर सदस्य म्हणून पुरुषोत्तम मुळे, डी. टी. आंबेगावे, विराज टिळक अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

Popular posts from this blog