रोहा नगरपालिका शिक्षण समितीचा प्रशासन अधिकारी करतोय मनमानी कारभार

शासनाला सादर केला जातोय विद्यार्थ्यांचा खोटा पट, ३ शिक्षकांचा पगार शासनाच्या माथ्यावर!
धाटाव/रोहा : किरण मोरे 
रोहा नगरपालिकेच्या मंगलवाडी संकुलात एकाच मैदानात तीन वेगवेगळ्या सुसज्ज शाळा सुरू असताना मंगलवाडी संकुलापासून (३ शाळांपासून) ५०० मीटर अंतरावर  नेहरूनगर शाळा क्रमांक ८ ही शाळा प्रशासन अधिकाऱ्यांनी केवळ भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने सुरू ठेवली आहे. शासनाला या शाळेचा दरवर्षी खोटा पट सादर केला जातोय आणि तीन शिक्षकांचा पगार शासनाच्या माथी मारला जातोय.
या शाळेचा पट कमी म्हणजे नगण्य असतानाही जवळच्या नगरपरिषद शाळेत तिचे विलिनीकरण का करत नाहीत? असा सवाल पालक विचारत आहेत.
सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा क्रमांक ९ मध्ये प्रभारी मुख्याध्यापक पद देताना भ्रष्टाचार करून सिनीयर शिक्षकाला डावलले गेले आहे.
कोविड-१९ संबंधित घरोघरी  फिरण्याची कामे मर्जीतील शिक्षकांना न देण्यामागे भ्रष्टाचारच असल्याचा संशय बळावत चालला आहे.
शिक्षकांचे शालांतर्गत सेवाज्येष्ठते नुसार बदलीचे नियम बदल्यात मिळणाऱ्या पाकिटाप्रमाणे बदलतात.
शाळा क्रमांक १ मध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नसताना तिथे मुख्याध्यापक समायोजित केला आहे.
नेहरूनगर शाळेतील सध्याचे ३ शिक्षकांचा पगार (साधारण रुपये ३ लाख) प्रशासन अधिकारी यांनी स्वतः द्यावा व शासनाचा या शिक्षकांवर झालेल्या आर्थिक अपव्ययाची वसूली प्रशासनाधिकाऱ्यांकडून करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Popular posts from this blog