भातसई ग्रामपंचायतीत पंतप्रधान घरकुल योजना यादी ग्रामसभेला डावळून चुकीच्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट, सुभाष खरिवले यांची तक्रार
रोहा : प्रतिनिधी
पंतप्रधान घरकुल योजना यादी ग्रामसभेला डावळून चुकीच्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट केल्याबाबत भातसई येथील सुभाष गोविंद खरिवले यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये यादीचे वाचन झाले आहे. त्यामुळे सदर लाभार्थ्यांची निवड कोणत्या शर्ती, अटी व निकषानुसार (नियमानुसार) निवड केली आहे? कारण शर्ती, अटी व नियमानुसार गरजू लाभार्थ्यांची निवड न करता ज्यांच्या नावावर मोठमोठी घरे आहेत व एका घरातील तीन तीन लाभार्थ्यांची नावे ग्रामसभेला डावळून बेकायदेशीर नावे टाकली आहेत. ही नावे कशी आली? कोण आहेत? ते ग्रामपंचायत मधील आहेत की, पंचायत समिती मधील आहेत ते शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. सदरील लाभार्थ्यांची नावे ही "ड" यादी मध्ये बेकायदेशीर रित्या कशी आली यामध्ये गरजू व नियमानुसार असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार नसून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होण्याचा संभव आहे. तरी सदरील घरकुलांची "ड" यादी हि रद्द करून तसेच कायदेशीर पडताळणी व चौकशी होऊन गरजू लाभार्थ्यांनाच त्याचा लाभ मिळावा चुकीच्या मार्गाने लाभार्थ्यांची यादी गैर मार्गाने तयार केलेली नामंजूर करून गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा व ही यादी रद्द करावी व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी व पडताळणी करून नियमानुसार नवीन यादी तयार करावी अशी तक्रार भातसई येथील सुभाष खरिवले यांनी ग्रामपंचायत, तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुशरीफ, जिल्हाधिकारी रायगड, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, जिल्हा परिषद रायगड, तहसीलदार रोहा, गटविकास अधिकारी-पंचायत समिती रोहा यांच्याकडे केली आहे.