भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्ञानरूपी तेजस पुतळा विद्यार्थ्यांना एक नवी स्फूर्ती देत राहील - उदयजी सामंत
माणगांव : उत्तम तांबे
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाही प्रत्यक्षात आनण्यामध्ये संविधानाचा फार मोठा वाटा आहे . लोकशाहीची प्रकृती जेव्हा-जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, ऑक्सिजन देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे . समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही भारताची संविधानाची जीवन रेषा आहे. हा सविधान रुपी ग्रंथ भारताला बहाल करणारे , सामाजिक समतेचा विचार देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे सहाशे एकर जागे मधील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या समोरील भागात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा व ज्ञानाचा प्रतीक असलेला हा पूर्ण कृती पुतळा आहे. हा तेजस ज्ञानरूपी पुतळा येथील विद्यार्थ्यांना एक नवी स्फूर्ती देत राहील असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी अभिमानास्पद प्रतिपादन केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सुनीलजी तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे, कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्ध पंडित, कुलसचिव डॉ. भगवान जोशी, सहाय्यक कुलसचिव विकास दादा गायकवाड, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.