रोहा तालुक्यातील "खादाड" अभियंत्याच्या दारू-मटणाच्या पार्ट्यांमध्ये ग्रामसेवकांचा सहभाग! 

बोगस कामांची बिले काढण्यामध्ये ग्रामसेवकांची भूमिका संशयास्पद!

धाटाव/रोहा (किरण मोरे) : 'कहानी में ट्विस्ट' हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. अर्थात, जेव्हा आपण एखादी कथा किंवा गोष्ट ऐकत असतो, तेव्हा पुढे काय घडेल याची उत्सुकता लागलेली असतानाच त्या गोष्टीला एक वेगळेच वळण लागते! अगदी तशाच प्रकारे वेगळेच वळण लागले आहे. रोहा तालुक्यात विकास कामांची बोगस बिले काढणाऱ्या खादाड अभियंत्याला ग्रामसेवकांची साथ मिळत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या खादाड अभियंत्याच्या दारूच्या पार्ट्यांमध्ये काही ग्रामसेवक देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत असल्याची विचीत्र माहिती उघडकीस आली आहे. हा अभियंता इतका बेवडा आहे की, "हा दारू पितो की, दारू ह्यालाच पिते?" असा प्रश्न उपस्थित झालेला आहे! 

त्यामुळे अशा प्रकारची बोगस कामांची बिले काढण्याच्या कारस्थानामध्ये ग्रामसेवकांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत बोगस विकासकामे झालेली आहेत. अर्थात, विकासकामे इस्टिमेंट प्रमाणे झालेली नाहीत, तर काही ठिकाणी विकासकामे झालेली नसताना देखील ती कामे "उत्कृष्ठ प्रकारची" झाली असा फक्त कागदोपत्री देखावा निर्माण करून अशा प्रकारच्या बोगस कामांची बिले अनेक ग्रामपंचायतींना अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे शासनाचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही बोगस बिले काढून देण्याचे काम एक खादाड अभियंता करीत असून अनेक ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक देखील या कामांमध्ये त्याला मदत करीत असल्यामुळे "पगार घेतात शासनाचा आणि दलाली करतात भ्रष्टाचाऱ्यांची!" असे या अभियंत्याबद्दल आणि ग्रामसेवकांबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे आता तर या अभियंत्याबरोबरच ग्रामसेवकांची देखील चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Popular posts from this blog