राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित रांगोळी स्पर्धेत योगेश डाकी यांचा सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

खासदार सुनिल तटकरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा अष्टमी आयोजित रांगोळी स्पर्धेत शेतपळस गावचे सुपुत्र योगेश डाकी यांनी सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकवला आहे.

या रांगोळी स्पर्धेमध्ये त्यांनी 'गड आला पण सिंह गेला' या विषयावर रांगोळी काढून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या रांगोळीला प्रथम क्रमांक मिळाला असून कलेचा महासागर म्हणून रोख रक्कम ५००१ व सन्मान चिन्ह देऊन खासदार सुनिल तटकरे, रायगड जिल्हाच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

Popular posts from this blog