माणगांव विळे भागाड एम आय डी सी मधील एका प्रतिष्ठीत कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव तालुक्यातील एका प्रतिष्ठीत नामचीन कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, फिर्यादी रुपेश मनोहर जाधव, वय ३३ वर्ष, व्यवसाय नोकरी, जात नवबौध्द, रा. आम्रपालीनगर-निजामपूर ता. माणगांव यांच्या फिर्यादीनुसार दि. २६ ऑक्टोबर सायंकाळी ४ वा. ते २८ ऑक्टोबर २०२१ सकाळी १० वा. चे दरम्यान मौजे विळे औद्योगिक क्षेत्रातील ईजीटेक कंपनीच्या मॅकॅनिकल ऑफीस समोर व्हरांड्यात महेंद्र तट्टे यांच्या ऑफिसमध्ये फिर्यादी हे अनुसूचित जातीचे नवबौध्द माहीत असल्याचे माहीत असताना आरोपी महेंद्र तट्टे, ली, विश्वजित कांबळे यांनी फिर्यादी यांना जातीय द्वेषातून अन्य कामगारांसमक्ष अपमानास्पद बोलून शिवीगाळी करून धमकी दिली.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ.गु.र.नं. २४१/२०२१ भा. दं. वि. क. ५०४, ५०६, अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंध अधि. १९८९ चे कलम ३(१) (आर) (एस) (यु) सह नागरिक हक्क संरक्षण अधिनियम १९५५ चे कलम ७(१) (ड), १४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील करीत आहेत.