नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रणाकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

गोफण/रोहा : रोहित कडू 

राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.12 नोव्हेंबर 2021 अन्वये नमूद केलेल्या नगरपंचायतीकरिता नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडत इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवण्याकरिता पुढील अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1) पाली- रोहा उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, 2) तळा- पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, 3) माणगाव- माणगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रशाली दिघावकर, 4)  म्हसळा- श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, 5)  पोलादपूर- महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड. 

या अधिकाऱ्यांनी  नगरपंचायत सदस्य पदाच्या (नागरिकांचा मागास प्रवर्ग)आरक्षणाची सोडत काढणे, (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) इत्यादी ते अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापर्यंतच्या कामावर नियंत्रण ठेवणे, ही कार्यवाही पूर्ण करण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. 

राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.29 ऑक्टोबर 2020 च्या आदेशान्वये रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार या नगरपंचायतींच्या आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण दिनांक 09 मार्च 2021 रोजी शासन राजपत्रात यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आलेली आहे. 

राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि. 09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या एकूण 86 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणाच्या सोडतीकरिता सुधारीत आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम 2021 जाहीर करण्यात आला आहे.

खालापूर नगरपंचायतीची दि. 12 नोव्हेंबर 2021 रोजी सुधारीत आरक्षण व सोडतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि. 12 नोव्हेंबर 2021 च्या सुधारीत आदेशान्वये खालापूर नगरपंचायत वगळता पाली, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण व सोडतीची फेर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

Popular posts from this blog