विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी कृष्णाळे तलावाची पाहणी करून तलाव स्वछ करून घेतला
पनवेल : शंकर वायदंडे
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १९ मधील कृष्णाळे तलावाच्या अस्वच्छतेबाबत वृत्तपत्राने दिलेल्या बातमीची दखल घेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी प्रशासनाला तलाव स्वछता करण्याचे आदेश देत तलाव स्वछ करून घेतले. प्रभाग क्रमांक १९ ची एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्था येथील सत्ताधारी नगरसेवकांनी केली आहे. ह्या प्रभागात प्राथमिक मूलभूत सुविधांचा अभाव आढळत आहे. रस्ते, गटार, ड्रेनेज ह्या प्रभागात दुरावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
कृष्णाळे तलावाची पाहणी करीत असताना प्रशासनाला सुचना केल्या आहेत. वडाळे तलावाच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाला येथील सत्ताधारी आणि ठेकेदार जबाबदार आहेत.असा आरोप करण्यात आला आहे.