रोहा नगर पालिका प्रशासन अधिकाऱ्याची मुजोरी, मुख्य चार्ज असताना रोह्यातून गायब? 

अनेक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित! 

प्रशासन अधिकाऱ्याचा कार्यभार सांभाळतेय महिला क्लार्क? 

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा नगर पालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अनेक शिक्षक चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचित आहेत. मंजूरीसाठी फाईल वर वजन ठेवण्याची मागणी कार्यालयाकडून केल्याची चर्चा आहे. त्याशिवाय वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर होणार नाही असे सांगितले जाते. गेली अनेक वर्षे प्रशासन अधिकाऱ्यानी शिक्षकांच्या फाईल दाबून ठेवल्याची शिक्षकांची तक्रार आहे. 

रोहा नगर पालिका येथे मुख्य चार्ज असताना सुद्धा प्रशासन अधिकारी रोह्यात कधीच हजर नसतात. त्यांचा सर्व कार्यभार व "आर्थिक देवाण-घेवाण" एक महिला क्लार्क सांभाळत असल्याचीही संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. त्यांच्या वतीने कारभार हाकताना कर्मचाऱ्यांची सुद्धा दमछाक होत आहे. शिक्षणाधिकारी, रायगड आणि मुख्याधिकारी रोहा नगर पालिका यांच्या आदेशाला काडीचीही किंमत प्रशासन अधिकारी देत नाहीत. कार्यालयात कुठल्याही शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. पटनिश्चितीप्रमाणे शिक्षक नियोजन केले जात नाही. काहि शाळांवर मंजूर शिक्षक संख्येपेक्षा शिक्षक कमी आहेत तर काही शाळांमध्ये मंजुरी पेक्षा जास्त शिक्षक संख्या आहे. कित्येक शिक्षक दहा बारा वर्षे एकाच शाळेत शिकवत आहेत, त्यांना आर्थिक (?) अभय आहे आणि काही गुणवंत शिक्षकांना शिक्षा म्हणून कमी पटाच्या शाळेत नेमले आहेत. 

रोहा नगर पालिकेच्या पटनिश्चितीप्रमाणे कुठल्याही प्राथमिक मराठी शाळेत मुख्याध्यापक पद मंजूर होत नसतानाही दोन मुख्याध्यापक नगरपालिका पोसत आहे. याची सर्व जबाबदारी प्रशासन अधिकाऱ्यावर असल्याने शासनावर पगाराचा अतिरिक्त पडणारा भुर्दंड प्रशासन अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Popular posts from this blog