चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : तळेवासियांची मागणी
तळा : संजय रिकामे
महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे खांबवली गावातील शेतात विजेच्या धक्याने चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी तळेवसियांनी केली आहे.
तळा तालुक्यात दोन दिवसांपुर्वी जोरदार वादळ आणि पाऊसाने थैमान घातले होते तालुक्यात अशी परिस्थिती आहे की लाईट गेली की बारा बारा तास येत नाही त्यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, वृद्ध लोकांचे अतोनात हाल होत आहेत.वीज बंद झाल्यावर वीज कधी येईल याची उत्तरे जनतेला मिळत नाहीत मोबाईल किंवा फोन उचलत नाहीत व बंद करून निघून जातात महावितरणची आपत्कालीन व्यवस्था सुरू केली की नाही याची माहिती फोन नंबर जनतेला कधीच देत नाहीत.त्याचप्रमाणे
ग्राहकाने वापरलेल्या विजेचा पुरेपूर मोबदला वसुलीचा अधिकार वीज पुरवठादार महावितरण कंपनीला असला, तरी वीज कायद्याचा भंग करून वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांवर वीजपुरवठा तोडण्याची कारवाई होत असल्याच्या विविध तक्रारी पुढे येत आहेत.
आपत्कालीन व्यवस्था कधीच पंधरा मिनटात हजर राहत नाही आज (दि.19) शेणवली येथे विजेच्या धक्याने चिमुकल्याचा मृत्यूची दुर्देवी घटना घडली याला महावितरण जबाबदार आहे अनेक वेळा तक्रार करून सुद्धा ती दुरुस्त न केल्याने त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार असणारे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तळे वासियांकडून होत आहे.