शिहूतील तरुणांनी घडविले माणुसकीचे दर्शन!
वाट चुकलेल्या व्यक्तीला दिले कुटुंबाच्या ताब्यात
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आताची तरुणाई इंटरनेट आणि मोबाईलमध्ये पूर्णतः गुरफटत चालली आहे. पण त्यातूनच काही तरुण सामाजिक बांधिलकी जपत आहेत. असे म्हंटले जाते देशाचे उज्वल भविष्य ही युवपिढी आहे आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरणं म्हणेज शिहू येथील तरुण!
काल रात्री ९ वाजताच्या दरम्यान एक व्यक्ती रस्त्याने चालत अलिबाग-पोयनाडच्या दिसेन जात असल्याचे काही तरुणांच्या निदर्शनास येताच शिहू येथील परमार्थ ग्रुप चे शुभम मोकल यांच्याकडे संपर्क साधला, शुभम मोकल यांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे नाव राजेश दांडेकर असल्याचे आणि ते रोहा-अष्टमी येथून चालत आल्याचे समजले. व्हाट्सअप द्वारे त्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क करून त्यांची माहिती दिली. थोड्या वेळाने त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी शिहू येथे पोहचले. आपला भाऊ सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी सर्व तरुणांचे आभार मानले.