रोहा तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस आयोजित ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा आज निकाल होणार जाहिर
रोह्यात दिपोत्सव कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार विजेत्या स्पर्धकांचा सन्मान
रोहा : रविना मालुसरे
सुंदर रांगोळ्या रेखाटणार्या युवती व महिलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दुहेरी उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेस रोहा यांनी तालुकास्तरिय आॕनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.
खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांच्या सहकार्याने युवती अध्यक्षा कु.रविना मालुसरे यांनी रांगोळी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. Selfi With Rangoli ह्या संकल्पनेवर आधारित ह्या अभिनव रांगोळी स्पर्धेला तरुणाईने उत्तम प्रतिसाद दिला.
फक्त रोहा तालुका मर्यादित असलेल्या ह्या स्पर्धेत जवळपास २५२ महिला व युवती स्पर्धकांनी सहभाग घेतला.सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुंदर रांगोळी रेखाटन केल्यामुळे तज्ज्ञ परिक्षकांचा परिक्षण करताना अक्षरशः कस लागला आहे.
ह्या अभिनव रांगोळी स्पर्धेचा निकाल आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५-३० वाजता रोह्यात होणाऱ्या दिपोत्सव कार्यक्रमात जाहिर होणार आहे.ह्याच कार्यक्रमात माननीय पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना सन्मानपत्र व भेटवस्तु देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच सर्वच रांगोळी स्पर्धक यशस्वी ठरले असल्यामुळे सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सन्मानपत्र माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात येतील.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र आॕनलाईन देण्यात येतील.तरी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहून नयनरम्य सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हावे असे आवाहन रोहा तालुका राष्ट्रवादी युवती व महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात येत आहे.