नागोठणे ते चोले रिलायन्स प्रकल्पग्रस्ताना निश्चितच न्याय मिळवून देणार - भीमराव आंबेडकर
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
वंचित बहुजन माथाडी ट्रान्पोर्ट व जनलर कामगार युनियन, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे ते चोले यांच्या न्याय हक्का साठी व आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेघर येथे दिनांक १ नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित भूमीपुत्रांना मार्गदर्शन करताना भीमराव आंबेडकर म्हणाले की, १५ नोव्हेंबर पासून आपण मुजोर रिलायन्स कंपनी बरोबर निर्णायक लढा देऊ आणि त्या निर्णायक लढायाच्या माध्यमातून आपल्या ज्या काही मागण्या आहेत बेरोजगार लोकांना रोजगार देऊन येणाऱ्या पिढीला पर्मनंट रोजगार मिळवा ही आमची न्याय मागणी आहे. कारण आमच्या ह्या भूमीपुत्रांच्या जमिनीवर ही कंपनी उभी आहे. हे आंदोलन शांततेत होईल पण जर का ठिणगी उडाली तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा भडका होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील आणि या लढ्यामध्ये रायगड जिल्हातील सर्व संघटनांचा पाठिंबा राहणार असल्याच त्यांनी या वेळी प्रसार माध्यमांसी बोलताना सांगितले. या वेळी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.