तळा नगरपंचायत सुधारित आरक्षण सोडतीमध्ये बाशिंग बांधलेल्यांचा झाला हिरमोड
तळा : संजय रिकामे
तळा नगरपंचायतीच्या नागरीकांच्या मागास प्रवर्ग सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडती करिता सुधारित आरक्षणाची सोडत अखेर काढण्यात आली. या सोडतीत काही दिगज्जांचे पत्ते कट झाले, तर काही इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. ज्या इच्छुकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या वॉर्डाची सोडत निघाली, ते नाराज झाले असल्याचे पहायला मिळाले. तर बाशिंग बांधलेल्यांचा हिरमोड झाला आहे. या सुधारित आरक्षण सोडतीमुळे शहरात निवडणुकीचे नव्याने वारे वाहू लागले आहेत. आरक्षण सोडतीनुसार सर्वच विद्यमान नगरसेवक नगरसेविकांचे त्यांच्या प्रभागातुन पत्ते कट झाले. त्यामुळे आरक्षणातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे.
तळा नगरपंचायतीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज (दि.१५) रोजी तळा पंचायत समितीच्या डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात सुधारित आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीसाठी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल ईनामदार, तळा नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके, तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी तळा नगरपंचायत कर्मचारी वर्ग राजकीय पक्षांचे प्रमुख आणि तळेवासी उपस्थित होते.
तळा नगरपंचायत आरक्षणाकडे गेले काही दिवस अनेकांचे लक्ष लागून राहिले होते जाहीर झालेली प्रभाग निहाय आरक्षण पाहता सर्वच्या सर्व विद्यमान नगरसेवकांचे त्यांच्या प्रभागातून पत्ते कट झाले आहेत सुधारित आरक्षणामुळे इच्छुकांना दुसरा प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली असून उमेदवारांनी संभाव्य प्रभागासाठी मोर्चा बांधणीला सुरवात केली आहे.
2015 मध्ये तळा नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली होती या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती राज्यातील दिग्गजांनी या निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या या निवडणुकीत रायगडचे माजी खासदार अनंत गीतेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणुक लढवली होती.यामध्ये शिवसेनेचे 11 नगरसेवक विजयी झाले होते.तर राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते.शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज केली होती.
पाच वर्षात अनेक बदल झाले असुन नुकताच माजी जिल्हा प्रमुख रवी मुंढे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असला तरी खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधे होणार आहे.भाजपा या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाते, यावर संपुर्ण नगरपंचायतीतील निकाल अवलंबून आहे.तळा नगरपंचायत सर्वात लहान नगरपंचायत असून या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार उमेदवारीसाठी कोण कोणत्या पक्षात जाणार तिकीट नाकारलं तर कोण अपक्ष म्हणून उमेदवारी लढविणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.
तळा नगरपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे आहे
प्रभाग क्रं-३प्रभाग क्रं-६, प्रभाग क्रं-7, प्रभाग क्रं-10 ,प्रभाग क्रं-11 व प्रभाग क्रं-17 या प्रभागातील आरक्षण बदले आहे यामध्ये प्रभाग क्रं-3(बामणघर गौळवाडी,बामणघर बौध्दवाडी,चंडिका पेट्रोल पंप रस्त्याच्या उत्तरेकडील भाग आसावरी हाॅटेल पर्यंत,GMV इंजिनीयर काॅलेज) पुर्वी -सर्वसाधारण महिला होते आता ना.मा.प्र.महीला राहील.प्रभाग क्रं-6(शेलके अळी, कासार अळी, राधाकृष्ण मंदिर परिसर)सर्वसाधारण होते ते सर्वसाधारण महीला राहील प्रभाग क्रं-7(जोगवाडी)-ना.मा.प्र. होते ते सर्वसाधारण राहील प्रभाग क्रं-10 (सोनार अळी, बाजारपेठ( बळीचा नाका ते मोदी तलाव रस्ता यांचा दक्षिणेकडील परिसर)ना.मा.प्र.महिला होते ते ना.मा.प्र. राहील प्रभाग क्रं-11 (चर्मकारवाडी, भिंगारे चाळ, कुरुक्कर दवाखाना, वेदकर चाळ)ना.मा.प्र. होते ते सर्वसाधारण राहील. प्रभाग क्रं-17( राणेची वाडी)सर्वसाधारण होते ते सर्वसाधारण महिला राहील.
प्रभाग क्र.1(वडाची वाडी,पारधी अळी पुसाटी वाडी)- ना.मा.प्र.महिला
प्रभाग क्रं-2(आनंदवाडी, वडाची वाडी जोड रस्ता पर्यंतचा घरे, इंदापुर तळा रस्त्याची उत्तरेकडील घरे)-सर्वसाधारण
प्रभाग क्रं-3(बामणघर गौळवाडी,बामणघर बौध्दवाडी,चंडिका पेट्रोल पंप रस्त्याच्या उत्तरेकडील भाग आसावरी हाॅटेल पर्यंत,GMV इंजिनीयर काॅलेज)-ना.मा.प्र.महीला
प्रभाग क्रं-4(वरचा मोहल्ला)-सर्वसाधारण
प्रभाग क्रं-5(पुसाटी ब्राम्हण अळी, कुंभार अळी)-सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रं-6(शेलके अळी, कासार अळी, राधाकृष्ण मंदिर परिसर) सर्वसाधारण महीला
प्रभाग क्रं-7(जोगवाडी) सर्वसाधारण
प्रभाग क्रं-8(तारणे तर्फे तळेगाव,आदिवासी वाडी)-सर्वसाधारण महिला प्रभाग क्रं-9(मधली अळी, चंडिका काॅप्लेक्स परिसर)-अनुसूचित जाती
प्रभाग क्रं-10 (सोनार अळी, बाजारपेठ( बळीचा नाका ते मोदी तलाव रस्ता यांचा दक्षिणेकडील परिसर)- ना.मा.प्र.
प्रभाग क्रं-11 (चर्मकारवाडी, भिंगारे चाळ, कुरुक्कर दवाखाना, वेदकर चाळ)-सर्वसाधारण
प्रभाग क्रं-12( परीट अळी, चंडिका मंदिर, शासकीय गोदाम परिसर)- सर्वसाधारण
प्रभाग क्रं-13(बौध्दवाडी, समर्थ नगर)अनुसूचित जाती महिला
प्रभाग क्रं-14(फोंडल वाडी,मेट मॅहल्ला, दगडी शाळा परिसर)-ना.मा.प्र.महीला
प्रभाग क्रं-15(भोईर वाडी)सर्वसाधारण महीला
प्रभाग क्रं-16 (अंबेळी आदिवासी वाडी,अंबेळी बौध्दवाडी,मुंढेची वाडी, राणेची वाडी तळेगाव रस्त्याच्या दक्षिणेकडील भाग)अनुसूचित जमाती महिला
प्रभाग क्रं-17( राणेची वाडी)-सर्वसाधारण महिला