स्वयंसेवक संघाकडून पंचशील नगर येथे दिवाळी निमित्त मनोमिलन चर्चा व फराळ वाटप
पनवेल : शंकर वायदंडे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवीन पनवेल च्या कार्यकर्त्यांनी पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी व नागरिकांन बरोबर पंचशील नगर येथे दिवाळी निमित्ताने लहान मुलांना दिवाळी फराळ वाटप केले. तसेच मनोमिलन चर्चा केली असून या पुढे सामजिक कार्यक्रम आयोजित करून लोकांचे प्रश्न आडी अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजू मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी तसेच जात धर्म विरहित नागिकांचा विकास आणि देश भक्ती पुढील पिढीत रुजवण्यावर पोचवू असे संकल्पना केली आहे.
या कार्यक्रमाला पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, कैलास नेमाडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राकेश शर्मा, नवीन पनवेल प्रचारक, शेषरावजी कडवे, कृष्णा तिवारी, पौरव शाह, योगेश जोशी, प्रितेश मिश्रा यांच्यासह पंचशील नगरचे रहिवाशी उपस्थित होते.