रोहा परिसरात प्रथमच निराधार, वंचित गोरगरीब गरजू, वृद्ध व अनाथांसाठी सुनंदा मोहिते यांच्यामार्फत वृद्धाश्रम सुरू
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यात सुतारवाडी येथे श्री कालकाई प्रसन्न वृद्धाश्रम स्थापन करून गरजू,पीडितांना व अनाथ, गरीब, वृद्ध, दिव्यांग अशा व्यक्तींसाठी सुनंदा मोहिते यांनी घेतलेले व्रत हे निश्चितच "माणुसकीचा झरा" असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही!
अशी समाजहिताची कामगिरी हाती घेऊन सुनंदा मोहिते यांनी जनतेसमोर एक महान आदर्शवत कामगिरी दाखऊन निराधार असणाऱ्यांना आधार दिला आहे. स्वतःची परिस्थिती काही फार गर्भश्रीमंत नसताना देखील मनाची श्रीमंती व अपंग, निराधार अबालवृद्ध यांच्यासाठी असलेली आत्मीयता, तळमळ, मायेचा मदतीचा हात पुढे करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. 'जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे!' ह्या वाक्या प्रमाणे त्यांनी हे वृद्धाश्रम सध्या सुतारवाडी येथे भाडे तत्वावर सामाजिक संस्था यांच्या हाताखाली चालु केले असुन येथे गरजू व निराधारांसाठी स्वस्त व माफक दरामध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. सौ. सुनंदा मोहिते यांनी आवाहन केले आहे आहे की, ज्या कोणी दानशूर लोकांना मदत करावीशी वाटत असेल त्यांनी ती सढलहस्ते करावी जेणेकरून येथील निराधार माणसांना ती उपयोगी येईल. तसेच कुणाला आपला वाढदिवस ह्या व्यक्तींसमावेत करावा असे वाटत असेल त्यांनी येऊन ह्या वृद्ध मंडळींना आनंदची पालवी समाधान लाभेल. जे कोणी ह्या आजी-आजोबांना मदत कुंवा वस्तू डोनेशन रूपाने देणारे असतील आशा व्यक्तीनीं सौ. सुनंदा मोहिते 9503480747 यांना संपर्क करावा असे आहवान करण्यात आले आहे.