पेण शहारातील स्ट्रिट लाईट दिवसा बंद करावे - रोहीत दादा शिंदे
पेण (प्रतिनिधी) : पेण शहारातील स्ट्रिट लाईट दिवसा ढवळ्या चालु असते. ते बंद करावे, कारण या मुळे विजबीलाचा भूर्दंड नागरिकांना भरावा लागत आहे. दिवसा या खांबावरील लाईटची आवश्यकता नाही तरीही विद्युत मंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. वारंवार अर्ज करूनही त्या लाईट बंद करीत नाहीत, त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन नाकते, श्री रोहीत दादा शिंदे यांनी केली आहे.
तरी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याविषयी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.