संभे ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यादीमध्ये प्रचंड घोळ, यादीतून अनेकांची नावे वगळली!

युवा नेते महेश ठाकूर यांच्याकडून उच्चस्तरिय चौकशीची मागणी 

धाटाव/रोहा : किरण मोरे

रोहा तालुक्यातील संभे ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या प्रपत्र "ड" अंतर्गत गटनिहाय तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. 

संभे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पालेखुर्द गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या यादीमध्ये गावातील अनेक नागरिकांना वगळले आहे. गावातील असे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक आहेत की त्यांची नावे देखील या यादीमध्ये समाविष्ट नाहीत. पालेखुर्द गावातील २० ते २५ नागरिक आज सुद्धा बेघर आहेत अशांची नावे सुद्धा या यादीमध्ये नाहीत. पती मयत झाल्यानंतर स्वतःच्या कुटबंबाचा आधार असलेल्या विधवा महिलांची नावे देखील या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. घरातील कर्ते पण जे अपंग आहेत अशा नागरिकांच्या नावांचा देखील घरकुल आवास येजनेच्या यादीमध्ये समावेश नाही. 

ग्रुप ग्रामपंचायत संभे मध्ये दि. २४ सप्टेंबर २०१६ ची तहकूब ग्रामसभा झाली. प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेची यादी या सभेमध्ये तयार झाली. परंतु ज्यांची घरे सुद्धा आस्तित्वात नव्हती अशा नागरिकांच्या नावावर या यादीमध्ये "पक्के घर" आहे असे नमूद केले आहे. त्यांुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही! याला जबाबदार कोण? असा सवाल युवा नेते महेश ठाकूर यांनी या महिन्यात झालेल्या संभे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत उपस्थित केला. 

संभे ग्रामपंचायतीमध्ये २०१६ ला जी घरकुल आवास योजनेची यादी तयार झाली त्या यादीनुसार जो सर्वे करण्यात आला त्यामधून सुद्धा पालेखुर्द गावातील सुमारे ३० लोकांना अपात्र ठरविण्यात आले आहे. परिणामी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी याप्रकरणी सखोल चौकशीची  मागणी युवा नेते महेश ठाकूर यांनी जिल्हाधिकारी रायगड व राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Popular posts from this blog