ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन होणार
तहसिलदार कविता जाधव यांची मतदारांना सूचना
रोहा : सदानंद तांडेल
रोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये मतदार यादीचे वाचन होणार असून त्यासंदर्भात रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी मतदारांना सूचित केले आहे.
दि. १६ नोव्हेंबर २०२१ पासून रोहा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये मतदार याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. तरी सर्व मतदारांनी आपली नावे संबंधित मतदार यादीत आहेत याची खात्री करून घ्यावी असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी १९१ पेण, १९२ अलिबाग, १९३ श्रीवर्धन तथा रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी केले आहे.