🚨 रोहा : ११४१ श्री सदस्यांनी केले रोहा शहर चकाचक! अभियानात १२८ सरकारी अधिकारीही सहभागी; ३४.५ टन कचरा स्वच्छ केला... 🚨 अलिबाग (रायगड) : एसटी आगारातील पोलीस चौकीचे उद्घाटन; जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण... 🚨 अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दरोडा व जबरी चोरी करणाऱ्या २ आरोपींना घेतले ताब्यात, दरोडा व जबरी चोरीचे ३ गुन्हे उघड... 🚨 सातारा : वडुज पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख रूपये किंमतीचे एकूण १० मोबाईल हस्तगत... 🚨 सातारा : शेतकऱ्याची फसवणूक करून दोन ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्याला वाई पोलीसांकडून अटक... 🚨 रायगड : आंबा नदीच्या ‘निळी पूररेषा’ क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम; कारवाईच्या आदेशानंतरही कारवाईस दिरंगाई - ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार... 🚨

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई 

३ बार्ज, सक्शन पंप आणि ३५ ब्रास वाळू जप्त!

रायगड (प्रतिनिधी) : अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील धरमतर खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी, अलिबाग श्री. प्रशांत ढगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर धडक  कारवाई केली.

या कारवाईत या पथकाने तीन बार्ज, एक सक्शन पंप आणि 35 ब्रास वाळू जप्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्यासह तहसिलदार मीनल दळवी, निवासी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, सारळ, मंडळ अधिकारी, नागाव, मंडळ अधिकारी, पोयनाड, तलाठी, कोतवाल सहभागी होते. 

दरम्यान, या कारवाईनंतर आता यापुढे अवैध वाळू उपसा कायम बंद राहिल की पुन्हा सुरू होईल? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

Comments

Popular posts from this blog