२९ नोव्हेंबर रोजी द. ग. तटकरे विद्यालय कोलाड येथे जिल्हास्तरिय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

रोहा : सदानंद तांडेल

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या स्पर्धेत जर स्वतःला सिद्ध करायचे असेल तर दिशा मिळणे गरजेचे आहे आणि म्हणूनच कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला व्यासपीठ मिळावे व या स्पर्धेच्या युगात आत्मविश्वास वाढवून स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे द. ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय, कोलाड या विद्यालयात कै. शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोजित केली आहे. मागच्या वर्षी ही स्पर्धा कोरोनाच्या निर्बंधांमुळे आपण ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक सहभागी करून ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन द. ग. तटकरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांनी केले आहे. 

या स्पर्धेमध्ये : 1) समाज घडविण्यात युवकांची जबाबदारी, 2) महागाई व वर्तमान समाजिक आर्थिक प्रश्न, 3) कोरोना काळाचे सामाजिक व शैक्षणिक परिणाम, 4) आपत्ती व्यवस्थापण एक सामाजिक जबाबदारी, 5) शिक्षणाचा आधारवड शिक्षणमहर्षी दादासाहेब लिमये... या विषयांचा समावेश असून प्रथम कमांक रूपये 3001/- स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय कमांक रूपये 2001/- स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय कमांक रूपये 1001/- स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र अशी बक्षिस योजना असून बक्षिस वितरण समारंभ स्पर्धेच्या दिवशी त्याच ठिकाणी दुपारी ठिक 3.00 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

स्पर्धेचे नियम : 1) कनिष्ठ महाविद्यालयांनी दोन स्पर्धक पाठवावेत, 2) प्रवेशिका पत्राद्वारे किंवा ई-मेल द्वारे पाठवू शकता, 3) प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2021आहे, 4) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक विद्यालयासाठी 100 रूपये राहील व तो स्पर्धेच्या दिवशी स्विकारला जाईल, 5) स्पर्धकाने आपला विषय 41 मिनिटे ह्या वेळेत मांडावा, 6) ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, 7) प्रवेश नोंदणी वेळ सकाळी 8.30 वाजता होईल, 8) स्पर्धेचे माध्यम मराठी, हिंदी व इंग्रजी राहील, 9) स्पर्धेसाठी परिक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील, 10) संपूर्ण कार्यक्रम कोविड 19 चे निर्बंध राखून पार पाडण्यात येईल, असे या स्पर्धेचे नियम आहेत.

याविषयी अधिक माहितीसाठी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलाड, ता. रोहा (कोकण रेल्वे पुलाजवळ)

श्रीमती खोडे मॅडम : 9766527890, श्री. कदम सर : 9011468485, श्रीमती बारदेस्कर मॅडम : 7588271274, श्री. महाडीक सर : 9226735622, श्री. डी. आर. पाटील : 7776937341, श्री. आर. एस. शिंपी 9421168455 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular posts from this blog