मन हेलावून टाकणारी घटना!
शेणवली येथे चिमुकल्याचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी अंत, कुटूंबियांना ३ लाख ७८ हजारांची मदत जाहिर
तळा : संजय रिकामे
आज तळा तालुक्यातील शेणवली येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली. काल झालेल्या वादळी पावसाने शेणवली गावाजवळ एका शेतात विजेची तार पोलावरून वरून तुटून खाली पडली होती. तार तुटून देखील त्या तारेत विद्युत पुरवठा सुरु होता. दुर्दैवाने त्याच शेतात ऋतिक यशवंत हिलम वय वर्ष दहा राहणार खाम्बोली आदिवासी वाडी हा आज सकाळी खेळण्यासाठी गेला आणि त्याचा त्या तारेला स्पर्श झाला आणि त्याचा तिथे दुर्देवी अंत झाला. या घटने संदर्भात तळा पोलिस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. महावितरण कंपनीने सध्या संपूर्ण ताकद वसुली करण्यात लावली आहे. परंतु कंपनीचे महत्वाच्या कामांकडे अजिबात लक्ष नाही त्यांनी अश्या प्रकारच्या घटना घडू नयेत या कडे जास्त लक्ष देणे गरजेचे असून तळा तालुक्यात अशी धोकादायक शेकडो ठिकाणे आहेत ती शोधून तातडीने दुरस्ती करणे गरजेचे असून भविष्यात असे अपघात होण्यापासून बचाव करता येईल. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून हीलम कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी शेकाप तळा तालुका चिटणीस धनराज गायकवाड यांनी केली आहे.
विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून, संबंधित दाेषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून हीलम कुटुंबाला आर्थिक मदत शासनाने करावी असे लेखी पत्र जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत ऋतिक याचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय -माणगाव येथून हलवणार नाही!
- धनराज गायकवाड, शे.का.प. तळा तालुका चिटणीस
महावितरण नमले!
उपकार्यकारी अभियंता तळा यांनी शेकाप चिटणीस धनराज गायकवाड यांनी केलेल्या मागणीचे लेखी आश्वासन दिले असून मृत बालकास ३ लाख ७८ हजाराची मदत जाहीर केली आहे. सर्व कागपत्र पुरविल्या नंतर ही रक्कम देण्यात येईल त्याचप्रमाणे तूर्तास अतीतातडिची मदत म्हणून २० हजार रुपये व प्रवास खर्च २ हजार रुपये असे एकूण २२ हजार रुपयांची मदत हीलम कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली आहे.