अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर पर्यंत
अलिबाग (जिमाका) : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीची स्थापना शिक्षण मंत्रालय, भारत सरकारद्वारे एक स्वायत आत्मनिर्भर प्रमुख परीक्षण संस्थेच्या स्वरुपात करण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) देशभरातील 33 सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
सैनिक स्कूल सातारा येथे सन 2022-23 च्या सत्रामध्ये इयत्ता 6 वी व इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा रविवार, दि. 09 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांच्यामार्फत घेतली जाणार आहे.
अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.26 ऑक्टोबर 2021 होती.परंतु प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत दि.05 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थी केवळ ऑनलाईन पध्दतीने आपला अर्ज https://aissee.nta.rnic.in या वेबसाईटवर दि.05 नोव्हेंबर 2021 या कालावधीत भरु शकतील, असे रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ज्योत्स्ना शिंदे-पवार यांनी कळविले आहे.