रायगड जिल्ह्यात अवैध धंद्यांना आलेय उधाण! 

धरमतर खाडीत बेकायदा ६ सक्शन पंप राजरोसपणे सुरू

तातडीने कारवाई करून हे बेकायदा सक्शन पंप कायमस्वरूपी बंद करावे : ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार

पोवळे नावाचा फालतू गुंड करतोय रेती माफीयांची चमचेगिरी 

रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात सध्या पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे अवैध धंद्यांना उधाण आलेले असून या अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ लागली आहे. दरम्यान, धरमतर खाडीत रेती माफीयांनी धुमाकूळ घातलेला असून येथे ६ सक्शन पंप सुरू असल्याची धक्कादायक माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी उघडकीस आणली असून सदरचे बेकायदा सक्षन पंप तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

धरमतर खाडीमध्ये रेती माफीयांचे ६ सक्षन पंप सुरू असून या अवैध धंद्याला विरोध करणाऱ्यांना धमकावण्यासाठी गुंडांना पुढे केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या रेती माफीयांनी १०० ते २०० रूपयांची दारू पाजून पोवळे नावाच्या एका फालतू गुंडाला पुढे केल्याचे दिसून आलेले आहे. या 'बेवड्या' पोवळे ने रेती माफीयांची चमचेगिरी करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. 

रेती माफीयांना बेवड्यांचे प्रोटेक्शन? 

धरमतर खाडीमध्ये धुमाकूळ घातलेल्या रेती माफीयांना बेवड्यांनी प्रोटेक्शन दिल्याचा एक विनोदी प्रकार समोर आलेला आहे. येथे ६ सक्शन पंप राजरोसपणे सुरू असून या अवैध धंद्याला जो कोणी विरोध करील त्याला धमकावण्यासाठी रेती माफीया १०० ते २०० रूपयांची दारू पाजून पोवळे नावाच्या एका बेवड्याला पुढे करीत असल्याचा एक विचीत्र प्रकार समोर आला आहे. 

महसुल विभाग बेवड्यांना घबरतो का? 

महसूल विभागाचे अधिकारी जर पोवळे नावाच्या बेवड्याला घाबरून रेती माफीयांवर कारवाई करत नसल्याने हा बेवडा जास्तच हवेत उडत असल्याचे दिसत आहे. धरमतर खाडीत अवैध वाळू उपसा सुरू असून येथील ६ सक्शन पंपांवर महसूल विभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.


Popular posts from this blog