शिष्यवृत्ती परीक्षेत वडघर मुद्रे हायस्कूलचे सुयश 

 भूमी धुमाळ व श्रुष्टी पवार यांना शिष्यवृत्ती प्राप्त 

माणगांव : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांनी 12 ऑगस्ट रोजी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विद्या मंदिर वडघर मुद्रे, ता. माणगांव तथा कै. शंकर सिताराम विद्या संकुलच्या  कु.भूमी हरिश्चंद्र धुमाळ व कु.श्रुष्टी  भिवा पवार या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवती प्राप्त केली आहे. शाळेतून एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यांपैकी दोन विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत.

या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली धारसे, शाळा समिती अध्यक्ष श्री. महादेव जाधव, सदस्य विजय सावंत यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. 

या दोन्ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार, चाणाक्ष, जिज्ञासू, आज्ञाधारक, प्रामाणिक, उत्तम वक्तृत्व शैली अशा असंख्य गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोन्ही विद्यार्थिनींचे मांजरवणे पंचक्रोशी व संपूर्ण तालुक्यातून, शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन केले जात आहे.

Popular posts from this blog