माणगांवमध्ये पत्रकार परिषदांना उधाण, लिंबू-टिंबू पण घेताहेत पुढाकार!

आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी

माणगांव (प्रमोद जाधव) : मागील २ वर्षे कोरोना संकट आणि आणि लॉकडाऊन यामुळे जनता त्रस्त होती. काही कालावधीमध्ये लॉकडाऊन निर्णयामध्ये शिथीलता आल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली. यामध्ये या जागतिक संकटात गोरगरीब जनता आणि सर्वसामान्य नागरिक यांना राजकीय क्षेत्रातील काही मदतीचे हात पुढे आले. तर काही बिळातील नागोबा बनून राहिले. मात्र सध्या शासकीय व प्रशासकीय नियमात शिथीलता आल्यानंतर काही दिवसातच राजकिय पुढाऱ्यांचा आवडता सण "निवडणूका" जाहीर होतील अशी चिन्हे दिसू लागल्यानंतर माणगांवमध्ये पत्रकार परिषदांना उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.

एक दोन ते तीन पत्रकारांना बोलवायचे आणि विरोधक व काही सामाजिक गोष्टींच्या फुशारक्या मारायच्या क्रिया प्रतिक्रिया द्यायच्या! अशा स्थितीचा काहीसा प्रकार माणगांव तालुका आणि माणगांव शहरात दिसून येत आहे. म्हणजे नक्कीच माणगांव नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचे पडघम माणगांव तालुक्यात वाजण्यास सुरुवात झाली आहे. अशी चर्चा देखील माणगांव शहरातील नाक्या-नाक्यावर ऐकावयास मिळत आहे आणि अशातच या निवडणुकीत उतरण्याची इछा असलेले थातुरमातुर पुढारी तर अशा क्रिया प्रतिक्रीया देतच आहेत आणि त्यांच्याबरोबर कोरोना लॉकडाऊन काळात बिळात लपलेले राजकीय पुढारी व सामाजिक नेते हे देखील प्रसारमाध्यमासमोर प्रतिक्रीया देण्यात उत्सुक झाले आहेत आणि लिंबू-टिंबू पण पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.

Popular posts from this blog