बेणसे ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचे व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
बेणसे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे व शिवसेना संपर्क कार्यालयाचे तसेच बेणसेवाडी येथील व्यायामशाळेचे उद्यघाटन अलिबाग - मुरुड विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभहस्ते दिमाखात संपन्न झाले. यावेळी बेणसे हद्दीतील जलतरण पट्टू व देशसेवक जवान यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी, रा. जि. प. सदस्य किशोर जैन, कामगार नेते दीपक रानावडे, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, पेण तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, युवासेना जिल्हा अधिकारी सुधीर ढाणे, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले, कामगार नेते साधुराम मालुसरे, पेण विधानसभा संघटिका दर्शना जवके, मा. उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे, उपविभाग अशोक भोय, अरुण कुथे, मधुकर पारधी, प्रीती कुथे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना व ग्रामस्थ उपस्थित होते.