आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : राज्य सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या अनुषंगाने माणगाव तालुकयातील भागाड एम. आय. डी. सी. येथे सणसवाडी महिला बचत गटाला राज्य शासनाकडून शिवभोजन थाळी योजने अंतर्गत शिवभोजन थाळी केंद्र चालविण्या करिता मान्यता प्राप्त झाली असून आमदार अनिकेत तटकरे यांचे हस्ते शिवभोज थाळी केंद्राचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महाड, माणगांव पोलादपूर मतदार संघाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, सणसवाडी सरपंच सौं. सुनीता नलावडे, उपसरपंच दिनेश धावडे, श्रीमती देविका पाबेकर  राष्ट्रवादी निजामपूर विभाग महिला अध्यक्ष, पाटणूस ग्रामपंचायत सरपंच सौ. नीलिमा निगडे, विळे सरपंच गजानन मोहिते, उपसरपंच मनोहर धामुनसे तसेच गणेश सकपाळ, संजय निगडे, विठ्ठल सावंत, राजन ढवण, शाम तवटे, जयदीप म्हामुणकर, तुळशीराम धावडे, कृष्णा जाधव आदी राष्ट्रवादी कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. 

उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आमदार अनिकेत तटकरे म्हणाले कि मी राज्य सरकार च्या वतीने ग्रामीण भागातील महिलांना सेवा देत आहे. सरकार प्रस्थापित झाल्यावर पहिल्याच अधिवेशनात शिवशाही योजना मंजूर झाली. एक कोटी लोकांपर्यंत ही योजना आम्ही पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच शिवभोजन केंद्र चालविणाऱ्या महिलांना माझे सांगणे आहे कि या पंचक्रोशीत जी वयोवृद्ध मंडळी आहेत जे आरोग्य दृष्ट्या अकार्यक्षम आहेत व ज्यांना जागेवरून हलता येत नसेल त्या लोकांपर्यंत ही सेवा देण्यात यावी. शिवभोजन थाळीचा दर्जा उत्तम असेल असा विश्वास मी सम्पादन करतो. शासनाचे जे नियम असतील त्या प्रमाणे आपण केंद्र चालवावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या भागात जिओ चे नेटवर्क लवकरात लवकर यावे यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू.

Popular posts from this blog