रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची कार्यकारणी जाहीर
रोहा (समीर बामुगडे) : रोहा पंचायत समिती कै. दत्ताजीराव तटकरे सभागृहामध्ये झालेल्या नवीन रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष डी. डी. चिपळुणकर यांनी अध्यक्षीय भाषणात संघर्ष केल्याशिवाय परिपूर्ण ग्रामसेवक होता येत नाही, आपल्या कार्यक्षेत्राचा अभ्यास करा व नवीन आलेले आत्यसात करा. सतत कार्यरत राहा आणि लेखासंहिता प्रमाणे ग्रामपंचायत दप्तर लावा. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये बराच बदल झालेला आहे त्याचा अभ्यास करा. तसेच प्रशासनाचा अभ्यास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवकाची पुढील वाटचाल लेखासंहितेवर अवलंबुन असल्याचे डी. डी. चिपळुणकर यांनी व्यक्त केले.
ग्रामसेवक संघटनेचे रोहा तालुका उपाध्यक्ष आर. पी. पाटील, कार्याध्यक्ष डी. एस. सावंत, सचिव अमोल ताबडे, खजिनदार जी. आर. शिद, सहसचिव अशोक गुट्टे, कायदेविशयक सल्लागार अप्पासाहेब कांबळे, महिला सहसचिव रेश्मा पाटील, महिला उपाध्यक्षा रेश्मा वेटकोळी, कायदेविषयक सल्लागार श्री. पाबरेकर या नुतन पदाअधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जातआहे.