इंदापूर येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे मार्गदर्शन
तळागळातील अपंगाना शासकीय लाभ मिळवू देणार - सुरेश मोकल
माणगांव : प्रतिनिधी
ना. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे मंगेशी मंगल कार्यालय येथे रविवार दि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी रायगड जिल्हा पदाधिकारी यांची मार्गदर्शन सभा घेण्यात आली. या सभेमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अपंग दिव्यांग पदाधिकारी कार्यकर्ते सभासद हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या सभेमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना अपंग क्रांती संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकरणी सदस्य सुरेशजी मोकल यांनी बोलता सांगितले की, ना. बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये तळागळातील दुर्गम खेडोपाड्यातील अंपगाना भेटून त्यांना शासकीय योजनेचा लाभ देणे हे आपल्या प्रहार अपंग संस्थेने काम करायचे आहे व त्यांना सरकार दरबारी न्याय मिळवून देणार असे सांगितले.
यावेळी रायगड जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक घाग, महिला जिल्हा अध्यक्ष कु. रमाताई चौगले, प्रहार जनशक्ती रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर, माणगांव तालुका अध्यक्ष रविद्रं सांगले, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष पाडूरंग डांगरेकर, पनवेल तालुका अध्यक्ष शिवाजी कांबळे, पेण तालुका अध्यक्ष भालचद्र भगत, महाड तालुका अध्यक्ष अतीफ चाफेकर, रोहा तालुका अध्यक्ष महबुब गफार अत्तार, मुरूड तालुका अध्यक्ष भारत भोईर, वडखळ विभाग अध्यक्ष राहुल म्हात्रे, सुधागड-पाली अध्यक्ष सुषमा शिंदे, निजामपुर विभाग अध्यक्ष इमरान जालगांवकर, तसेच माणगांव तालुका प्रहार क्रांती संघनेचे उपाध्यक्ष नितेश मिरगुले, सचिव अमोल पांगारे, इंदापुर विभाग अध्यक्ष राजेद्र पांचाळ, उपाध्यक्ष मगेश वाढवळ, सचिव सुहास गंभीर यावेळी उपस्थित होते.
या जिल्हा मार्गदर्शन सभेमध्ये तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी, सभासद यांच्या समस्या ऐकून त्या जिल्हा व तालुका पातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगानी प्रहार अंपग क्रांती संस्थेमध्ये आपल्याला न्याय मिळण्यासाठी सभासद व्हावे त्यासाठी तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सुरेश मोकल यांनी शेवटी बोलताना केले.