रोहा-दिवा मेमो गाडीला हिरवा कंदील

पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन

उपस्थित प्रवाशांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

रोहेकरांनी मानले खासदार सुनिल तटकरे यांचे आभार

रोहा (रविना मालुसरे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नांतून व रोहा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती रोहा यांच्या पाठपुराव्याने रोहेकरांची लाईफलाईन असलेली रोहा-दिवा मेमो रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेगाडी सुरू करण्यात आली.

सुमारे दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाचा संसर्ग वाढला. केंद्र सरकारने अचानक केलेल्या लॉकडाऊन नंतर रेल्वे सेवा बंद करण्यात आली .आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन जीवन पूर्वपदावर येत असताना सर्वत्र रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. मात्र रोहा-दिवा रेल्वे सेवा सुरू करण्यात केंद्रीय रेल्वे मंत्रालय फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत होते.अखेर रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहेकरांची जनभावना ओळखून तसेच रेल्वे प्रवासी संघर्ष समितीच्या मागण्यांन्वये दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात रोहेकरांच्या भावना व मागण्या ठामपणे मांडल्या. त्यातूनच आज  रोहा-दिवा मेमो गाडी मार्गस्थ झाली.हे सारे जाणकार रोहेकरांनी जाणले म्हणूनच ही गाडी मार्गस्थ होत असताना रोहेकर नागरिकांनी खासदार सुनील तटकरे साहेबांचे आभार व्यक्त केले.

आज दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी रोहा रेल्वे स्थानकांत रायगडच्या पालकमंत्री तथा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य कु. आदिती तटकरे यांनी गाडीचे पूजन केले. तर विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपस्थित प्रवासीवर्गाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे, मधुकर पाटील विनोद पाशिलकर,महेंद्र गुजर,विजयराव मोरे, अमित उकडे,महेंद्र दिवेकर,महेश कोल्हटकर प्राजक्ता चव्हाण, जयवंत मुंडे, रविना मालुसरे, विनीत वाकडे, अक्षय नागोठणेकर, शंतनू रटाटे तसेच प्रवासी संघर्ष समितीचे पदाधिकारी, रेल्वे अधिकारी,रेल्वे पोलिस, रोहा पोलीस व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog