भन्नाट ऑफर; कोरोना लसीचा एक डोस घ्या अन् मिळवा मोफत तेलाची पिशवी!
युवा अनस्टाॅपेबल व समाजसेवक कृष्णा महाडिक यांचा स्तुत्य उपक्रम
तळा (संजय रिकामे) : कोरोनापासुन सुटका मिळविण्यासाठी अनेक देश सध्या लसिकरण मोहिमेवर भर देताना दिसत आहेत. काही ठिकाणी नोंदणी करुनही लस मिळत नाहीत तर काही ठिकाणी लस असुन ती घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. कोरोनाच्या दुसरया लाटेने संपुर्ण जगात हाहाकार माजला आहे याचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे.1 मे पासुन 18 वर्षांवरिल सर्वांना लस मिळण्यास सुरवात झाली परंतु लसीचा अभाव असल्याने अनेकांना नोंदणी करुनही लसिकरणाची वाट पहावी लागत आहे.परंतु जगात असे काही देश आहेत जे लसीकरण करण्यासाठी लोकांना विविध आणि भन्नाट आॅफर्स देत आहेत.मोदी सरकार लवकरात लवकर देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न आहेत त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयोग सरकार करत आहे.गुजरात सरकारने महिलांनी डोस घेतल्या नंतर तेलाची पिशवी बक्षीस म्हणुन मोफत दिली आणि महिलांमध्ये लसिकरणाचे प्रमाण वाढले.
नाना स्मृती पालकर ट्रस्टचे व्यवस्थापक समााजसेवक कृष्णा महाडिक यांनी युवा अनस्टाॅपेबल अहमदाबाद गुजरात या संस्थे बरोबर चर्चा करुन गुजरातचा हा प्रयोग महाराष्ट्रात राबविण्यासाठी पाठपुरावा केला.या सामाजिक संस्थेने परवानगी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव आणि तळा तालुक्यात लसिकरण करणारया महीलांना तेलाची पिशवी बक्षीस म्हणुन मोफत देण्याचे आयोजन करण्यात आले वीस हजार लीटर तेल पिशव्यांचा साठा युवा अनस्टाॅपेबल अहमदाबाद गुजरात या संस्थेच्या वतीने पुरविण्यात आला असुन अभिनव ज्ञान मंदिर उसर येथे लसिकरणाचे आयोजन करुन महीलांना तेल पिशवी बक्षीस म्हणुन वाटप करण्यात आले यावेळी नाना स्मृती पालकर ट्रस्टचे व्यवस्थापक समााजसेवक कृष्णा महाडिक, युवा अनस्टाॅपेबल अहमदाबाद गुजरातचे महाराष्ट्र प्रतिनिधी राजेश पुरोहीत, तळा पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, उसर ग्रामपंचायत सरपंच सायली घाग, वैद्यकीय अधिकारी डाॅ. गोरेेेगावकर, मुख्याध्यापक श्री.दुधाळ, शांतराम नटे, पत्रकार भारत गोरेगावकर, संजय रिकामे आदि मान्यवर उपस्थित होते.
महिलांसाठी लसिकरण झाल्यानंतर बक्षीस म्हणुन मोफत तेलाची पिशवी देण्यात आल्यामुळे येथे उपस्थित असलेल्या महिलांचे कोवीड लसिकरण संदर्भात अनेक गैरसमज दुर करुन जास्तीत लसिकरण होत असल्याचा दावा युवा अन स्टाॅपेबलचे महाराष्ट्र प्रतिनिधी राजेश पुरोहित यांनी केला असुन सध्या वीस हजार लीटर तेलाचा पुरवठा करण्यात आला असुन अजुन दहा ते पंधरा हजार लीटर तेलाचा साठा संस्थेच्या मार्फत करण्यात येईल असे सांगितले.