संजय वढावकर यांची इंडस्ट्री ऑल या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेवर निवड

रोहा (समीर बामुगडे) : महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची दक्षिण आशिया पॅसिपीक  युनियन विभागातून इंडस्ट्री ऑल या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या कार्यकारी मंडळावर  निवड झाली आहे.

जगातील १४० देश व ५० कोटी सभासद संख्या असलेल्या इंडस्ट्री ऑल  ग्लोबल युनियन या अंतरराष्टीय कामगार संघटनेचे जिनिव्हा येथे जागतिक  मुख्यालय आहे. कार्यकारी मंडळाच्या  चार वर्षे कालावधीकरिता ६० जागांसाठी  ऑनलाईन पद्धतीने चार हजार प्रतिनिधीमधून दक्षिण आशिया पॅसिपीक  विभागातून  महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची तर इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांची भारतातून निवड झाली आहे. भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान व बांगला देश  या पाच देशांची जबाबदारी सजय वढावकर  यांच्यावर  राहील. 

भारतातील तिसऱ्या क्रमांकाची ९२ लाख सभासद असलेल्या हिंद मजदूर सभा या राष्ट्रीय कामगार संघटनेचे गेली अनेक वर्षे संजय वढावकर  हे कार्यकारणी सदस्य आहेत. पोर्ट, रेल्वे, एसटी, बेस्ट, नागरी वाहतूक, कोळसा, साखर,  इंजिनिअरिंग, केमिकल, डिफेन्स इत्यादी उद्योगातील जवळजवळ पाच लाख कामगारांचे ते समर्थपणे नेतृत्व करीत आहेत. तसेच दोन लाख सभासद असलेल्या स्टील अँड मेटल इंजिनिअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. त्याचप्रमाणे टेक्सटाईल कामगार सभा ठाणे व जनरल मजदूर सभा    या कामगार संघटनांचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. डहाणू बंदर व दिघी पोर्ट येथील हजारो कामगारांच्या हक्कासाठी ते कार्यरत आहेत.  असंघटीत कामगारांसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

Popular posts from this blog