छावा प्रतिष्ठान माणगांवच्या विद्यमाने ओमकार भजनी मंडळाचा सन्मानपूर्वक गौरव 

माणगाव (उत्तम तांबे) : जुलै २०२१  मध्ये महाड-पोलादपूर येथे उद्भवलेल्या भीषण पूरस्थिती व दरड कोसळल्यामुळे भयानक संकट उद्भवले होते. या परिस्थितीकडे लक्ष देऊन अनेक सेवाभावी संस्थांने पुढे येऊन "एक हात मदतीचा" देऊन अन्नधान्य, कपडे, भांडी, अशा विविध जीवनावश्यक वस्तूंची हस्ते परहस्ते माणुसकीच्या नात्याने भरघोस मदत केली. त्याचाच एक भाग म्हणून एक हात मदतीचा या पार्श्वभूमीवर ओमकार भजनी मंडळ खांदाड माणगांव यांनी तात्काळ या पूरग्रस्त घटनास्थळी धाव घेऊन व पाहणी करून तेथील जनतेला माणुसकीने मायेचा व मदतीचा हात दिला. या सेवाभावी ओमकार भजनी मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी छावा प्रतिष्ठान माणगांव यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून या मंगलमय दिनी ओमकार भजनी मंडळाचा छावा प्रतिष्ठान तर्फे संस्थेचे अध्यक्ष निलेश थोरे यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ज्या ज्या संस्थांनी एक हात मदतीचा देऊन सहकार्य केले आहे त्या त्या संस्थेचा छावा प्रतिष्ठान द्वारे सन्मानपूर्वक गौरव करण्यात येणार आहे असे थोरे यांनी सांगितले. 

माझ्या जन्माच्या अगोदर पासून ओमकार भजनी मंडळ कार्यरत आहे या संस्थेचे मंडळाचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ही सेवाभावी संस्था विविध उपक्रम राबवून अनेकांच्या संकटकाळी धाव घेऊन मोठा मदतीचा हात देत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. अशा कर्तव्यशील मंडळाचा गौरव करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे माझे मी भाग्य व कर्तव्य समजतो असे यावेळी निलेश थोरे यांनी शब्द सुमनांनी शुभेच्छा देऊन ओमकार भजनी मंडळाचा आदरपूर्वक सन्मान केला. या सत्कार समारंभाच्या प्रारंभी ओमकार भजनी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक श्री उत्तम तांबे यांनी छावा प्रतिष्ठान माणगांवचे शब्दसुमनांनी  स्वागत केले व शेवटी माजी अध्यक्ष श्री चेतन गायकवाड यांनी मनपूर्वक सर्वांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी अलिबाग पंचायत समिती सदस्या सौ. रचना निलेश थोरे, ज्येष्ठ समाजसेवक अनंता थळकर, युवा उद्योजक विपुल उभारे, सुमित काळे, प्रवीण लांगे, कपिल गायकवाड, यशवंत सावंत, अल्पेश मांजरे, निलेश यादव, मंदार शेलार, निलेश सुतार, संदीप गव्हाणकर, संपन्न घर्वे, सुधीर कनोजे, सुहास शिंदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog