धामणसई विभागातील विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही! - आमदार अनिकेतभाई तटकरे
रोहा (रविना मालुसरे) : धामणसई ग्रामपंचायत व विभागातील विकासकामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी दिली. दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी धामणसई ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. धामणसई ग्रामस्थांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षांतर करून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. भविष्यात त्यांचा भ्रमनिरास होऊ दिला जाणार नाही असेही त्यांनी प्रतिपादित केले, धामणसई धनगरवाडा, आदिवासीवाडी या गावातील प्रलंबित विकासकामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रोहा तालुक्यातील सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या मताधिक्क्याने जिंकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तरुणाईने राजकारणात उतरून घडवून आणलेल्या बदलांचे त्यांनी विशेष कौतुक केले. पेण विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय आमदारांना भविष्यात जनताच घरचा रस्ता दाखवेल व पुढील काळात या मतदारसंघाचे नेतृत्व महाविकास आघाडी करेल असे भाकीत करण्यास ते विसरले नाहीत.
धामणसई ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या समवेत विजयराव मोरे, विनोद भाऊ पाशिलकर, अनिल भगत, जयवंतदादा मुंडे, घनश्याम कराळे, मयुर खैरे, हेमंत कडव, रसिका मालुसरे, योगेश शिंदे, प्रसाद देशमुख, नंदकुमार खांडेकर, चिंतामणी खांडेकर, शारदा पाशिलकर यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील कन्येची राष्ट्रवादी युवती काँग्रेस रोहा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कु. रविना मालुसरे यांचा विशेष सत्कार संयोजकांच्यालवतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच महादेव सानप यांनी केले, तर सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच नेहा जंगम, उपसरपंच सुशील घाटवळ, वृषाली कदम, शर्वरी कदम, सारिका वाघमारे, किसन शीद, विजय जाधव, सुभाष भोकटे, अनंत कोकळे, शंकर घाटवळ, विठोबा निकम, अंकुश वाघमारे, रोहिदास कदम, गजानन घाटवळ, महादेव सानप, भाऊ कोकळे, नितेश जाधव, दिलीप जंगम, शंकर कदम, संगीता कोकळे, प्रकाश वरणकर तसेच ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, धामणसई इंदरदेव, गावठण, आदिवासीवाडी यांनी अथक परिश्रम घेतले.