काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची जोरदार चपराक 

रोहा पंचायत समितीचे सदस्य बिलालशेठ कुरेशी राष्ट्रवादीतुन पुन्हा काॅंग्रेसमध्ये!

रोहा (समीर बामुगडे) : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या की इतर पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध आश्वासने देऊन, साम-दाम, दंड -भेद या सर्व नितीचा वापर करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करवून घ्यायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि सांगायचं कि, विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष वाढतोय असे भासवायचं. परंतु भोळ्या-भाबड्या लोकप्रतिनिधींचा वापर करायचा आणि उपयोग झालं का रस्त्यावर सोडुन द्यायचं हा तटकरेंचा शिरस्ता असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

याच रितीने रोहा पंचायत समितीचे सद्स्य बिलालशेठ कुरेशी या नागोठणे विभागातील काँग्रेस सदस्याचा भुलथापांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला. परंतु अवघ्या २४ तास उलटण्याच्या आतच नागोठणे विभागातील काँग्रेसचे नेते शब्बीर शेठ पानसरे, शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार यांनी बिलालशेठ कुरेशी यांना परत स्वगृही काँग्रेसमध्ये परत आणले.

काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सचिव सौ. नंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलाल शेठ कुरेशी यांचा काँग्रेस मध्ये स्वगृही पक्षप्रवेश महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर येथील सुखकर्ता या बंगल्यावर पार पडला.

यावेळी शब्बीरशेठ पानसरे, शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, राजेंद्र म्हात्रे, युवानेते सद्दाम दफेदार, सर्फराज हाफिज, रमीझ दफेदार, आदिल पानसरे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog