रा. जि. प. शाळा भाले, केंद्र निजामपूर तर्फे ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक व आभार
माणगांव (प्रतिनिधी) : शासनाच्या आदेशानुसार इयत्ता पाचवी पासून पुढील वर्ग योग्य ती खबरदारी घेऊन चालू करण्यात आले आहेत. अशा प्रसंगी विद्यार्थ्यांचे तापमान तपासणी करण्यासाठी टेम्प्रेचर गन, ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटर, मास्क, सॅनिटायझर असे अनेक प्रकारचे साहित्य ग्रा.प.भाले, आरोग्य विभाग (आशा), स्वदेश फाउंडेशन इ. माध्यमातून रा. जि. प. शाळा भाले शाळेस देण्यात आले आहे. वेळोवेळी यापूर्वी देखील ग्रामपंचायती मार्फत शाळेसाठी उत्कृष्ट असे सहकार्य लाभले असल्याने सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शालेय प्रथम दिनी रा. जि. प. शाळा भाले तर्फे सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सरपंच विवेक खानविलकर यांचे आभार मानण्यात आले. तसेच एकाच दिवसात जास्तीत जास्त लसीकरण करून जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या निजामपूर आरोग्य विभागाचे कर्मचारी खराडे अण्णा, वाघमारे सिस्टर, काजल खानविलकर तसेच आशा ताई स्वप्नाली शेपोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. योग्य सुसूत्रतेमुळे ग्रामपंचायतीच्या सुमारे ९० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच ग्रा. पं. कर्मचारी खानविलकर यांचे देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अस्मिता चाळके आणि शाळेतील शिक्षक वृंद यांच्यातर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.