बोगस बिले काढण्यात पटाईत! शासनाच्या तिजोरीवर अभियंता मारतोय डल्ला!
रोहा तालुक्यातील 'खादाड' अभियंत्याचा लवकरच होणार पर्दाफाश
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यात विकासकामांची बोगस बिले काढून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या एका खादाड अभियंत्याचा लवकरच पर्दाफाश होणार आहे.
रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने विकासकामे झालेली आहेत, तर काही ठिकाणी कामे झालेली नसताना देखील कागदोपत्री कामे झाल्याची नोंद करून त्यांची बोगस बिले काढून शासनाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या एका अभियंत्याने तर रोहा तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा तर 'पैसेखाऊ' म्हणून प्रसिद्ध होत चालला आहे.
कमिशन घेऊन बोगस बिले काढून भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणाऱ्या या अभियंत्याला "भ्रष्टाचारी अभियंता" असेही बोलले जात आहे. शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारून आपल्या काळ्या कमाईतून या खादाड अभियंत्याने अनेक ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याचे उत्पन्न किती? आणि याने विकत घेतलेली प्रॉपर्टी किती? याचीही चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.