मेढा विभाग वारकरी सांप्रदायातर्फे भगवान गोवर्धने यांचा सत्कार
रोहा (समीर बामुगडे) : मेढा विभाग वारकरी सांप्रदायने श्री. भगवान गोवर्धने (चेअरमन को.ए.सो. मेढे हायस्कुल तथा माजी सरपंच मेढा) यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय व अतुलनिय निःस्वार्थी कार्य करुन शाश्वत सेवा केल्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या सन्मानार्थ विधायक व कौतुकास्पद कार्याची दखल घेवुन आंतरराज्य पुरस्कार वितरण समिती बेळगाव तर्फे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा च्या वतीने सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आल्याबद्दल मेढा विभाग वारकरी सांप्रदायच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी वारकरी सांप्रदायचे अध्यक्ष श्री. पांडूरंग करंजे, मधूकर खरिवले, मोरेश्वर लक्ष्मण खरिवले, रामभाऊ मोहिते, पोळेकर गुरुजी, खेळू खांडेकर, चंद्रकांत खरिवले, भाऊ खांडेकर व वारकरी संप्रदायाचे बहुसंख्य वारकरी उपस्थित होते.