ॲडमिशन ओपन झाला आहे, रोहा-सुतारवाडी येथे श्री काळकाई प्रसन्न वृद्धाश्रमाची स्थापना!
सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनंदा मोहिते यांचा स्तुत्य उपक्रम
रोहा (समीर बामुगडे) : रोहे तालुक्यातील सुतारवाडी कॉलेज जवळ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनंदा मोहिते यांच्या विशेष पुढाकारातून श्री काळकाई प्रसन्न वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात आली आहे.
या वृद्धाश्रमामध्ये अपंग, व्याधीग्रस्त तसेच बेडरेस्टवर असणारे रुग्ण यांनादेखील प्रवेश देण्यात येणार असून वृद्धाश्रमाचा परिसर हा अत्यंत रमणीय व आल्हाददायक आहे. सदर वृद्धाश्रमामध्ये डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, स्वयपाकी(शाकाहारी व मांसाहारी भोजन) यांची सुविधा उपलब्ध असणार असून तेथे येणाऱ्या सभासदांना सर्वोत्तम सेवा देण्याचा सौ. सुनंदा मोहिते यांचा मानस आहे. सदर वृद्धाश्रमात प्रवेश घेण्यासाठी या आश्रमाच्या संस्थापक सौ. सुनंदा मोहिते (9503480747) या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.