रायगड जिल्ह्यात पुन्हा बेकायदा जुगार क्लबचा धुमाकूळ सुरू! या जुगाराला आशिर्वाद कुणाचा?
मटका सुरू करायचा असल्यास १५ हजारांचा हफ्ता द्या : पाटणकर नावाच्या भामट्याची बंद पडलेल्या मटका चालकांना ऑफर!
रायगड (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्यात सध्या बेकायदा जुगार क्लब चालकांनी पुन्हा आपले डोके वर काढले असून यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, अलिबाग, पेण, डोलघर, पनवेल या परिसरात बेकायदा जुगार क्लब पुन्हा राजरोसपणे सुरू झालेले असून पोलीस प्रशासनाने हे अवैध जुगार क्लब तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तसेच एक बेकायदा मटका जुगाराबाबत एक विचीत्र माहिती उघडकीस आली आहे. पाटणकर नावाचा एक भामटा तर बंद पडलेल्या मटका चालकांना ऑफर देत असल्याचे निदर्शनास आलेय. हा भामटा म्हणयोय की, 'मटका सुरू करायचा असेल तर मला १५ हजारांचा हफ्ता द्या!'
अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या मटका-जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. सदरचे बेकायदा धंदे रायगड जिल्ह्यात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.