ज्येष्ठ महिलांचा सन्मान आणि साडी वाटप कार्यक्रम संपन्न
रोहा (समीर बामुगडे) : रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रिय आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अनिकेत भाईतटकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कारकीर्द पाहता प्रत्येक नागरिकाला सहकार्याची भावना जोपासत असलेले आपल्या नेतृत्वाच्या वाढदिवसाचे निमित्त कृतज्ञता व्यक्त करत असतानाच 'रमला जो माणसात ज्याने माणुस जपला सगळ्यांना वाटे हा माणूस आपला' ह्या उक्तीप्रमाणे तसेच नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहुर्ता वर नारी शक्तीचा सन्मान हाच आमुचा अभिमान या उपक्रमा अंतर्गत पच्छीम खोरा ज्येष्ठ महिलांचा सन्मान तसेच साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. नंदुशेठ म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती सौ. राजेश्रीताई पोकळे, श्री. लक्ष्मण महाले, श्री. भगवान गोवर्धने, श्री.राजेंद्र पोकळे, श्री. विलास खांडेकर, श्री.विलास उंबरे, श्री. रविंद्र जाधव, श्री. उदय मोरे, श्री.नवनीत डोलकर तसेच सर्व ग्रामस्थ वर्गासोबत आयोजनकर्ते युवा नेते श्री. मयुर खैरे यांच्या समवेत श्री. अभिषेक पोकळे, श्री. चंद्रकांत ठमके, श्री. निवास खरीवले, श्री. अंकुश ताडकर, श्री. सतीश मोहिते, श्री.अमोल टेमकर, श्री. विकास खांडेकर, श्री. संतोष भोइर, श्री. तानाजी जाधव, श्री.परेश म्हात्रे, तसेच पच्छिम खोरा युवक कार्यकर्ते यांनी यशस्वी रित्या पार पाडून आपल्या नेत्याला आपल्या हक्काच्या जनसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.