प्राथमिक शाळा शिहू येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : १५ ऑक्टॉबर रोजी जागतिक हात धुवा दिवस सर्वत्र साजरा केला जातो, पण १५ रोजी दसऱ्या निमित्त शाळांना सुट्टी असल्यामुळे १४ ऑक्टॉबर रोजी प्राथमिक शाळा शिहू येथे जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शिक्षीका सुप्रिया पिंगळे यांनी विद्यार्थांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले व मुख्याध्यापक जीवन ठाकूर सरांनी हात धुवण्याचे महत्व सांगून हात धुण्याने आपल्या आरोग्याला होणारे फायदे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हात धुणे किती महत्वाचे आहे ते त्यांनी या वेळी विद्यार्थांना सांगितले.
या वेळी उपस्थित मुख्याध्यापक जीवन ठाकूर, सुप्रिया पिंगळे, संगीता बहिरशेठ, जगताप बाई व विद्यार्थी उपस्थित होते.